Mobile apps,free Tricks,games full versions,Download top apk games, computer hacking tools software,Become an Ethical Hacke

Post Top Ad

सावधान...ई-सिगारेटही तेवढीच घातक!.....जागतिक आरोग्य संघटना

सावधान...ई-सिगारेटही तेवढीच घातक!.....जागतिक आरोग्य संघटना

ई-सिगारेट ही आरोग्याला घातक नसल्याचा कंपन्यांचा प्रचार खोटा असून ई-सिगारेट ही सामान्य सिगारेट एवढीच किंबहुना त्यापेक्षाही अधिक घातक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)ने दिला आहे. भारतासह आशिया खंडामध्ये ई-सिगारेटच्या वाढत्या विक्रीवरही जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.
तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत होत असलेल्या जनजागृतीमुळे धूम्रपान करण्याकडे कल कमी होत आहे. कायद्याचा बडगा व सिगारेटवरील करांमुळे तंबाखू उत्पादन कंपन्या अडचणीत आल्या होत्या. आता ई-सिगारेटच्या माध्यमातून त्या पुन्हा या व्यवसायात मोठ्या ताकदीने उतरू लागल्या आहेत. या कंपन्यांकडून ई-सिगारेट ही आरोग्यास घातक नसल्याचा होत असलेला प्रचार तेवढाच घातक आहे. ई-सिगारेटचे उत्पादन आणि विक्रीवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे त्यात वापरल्या जाणाऱ्या घटकांबाबत निश्चित माहिती मिळू शकत नाही.
सध्या भारतात ई-सिगारेट ही ऑनलाइन विक्रीसह अनेक स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध आहे. ती अशी सहज उबलब्ध होत असल्याने आणि आरोग्यासाठी चांगली असल्याच्या खोट्या प्रचारामुळे युवावर्ग सध्या या कंपन्यांच्या जाळ्यात अडकत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने येत्या ऑक्टोबरमध्ये जगभरातील ई-सिगारेटच्या वाढत्या धोक्यावर एका परिषदेचे आयोजन केले आहे. तत्पूर्वी दक्षिण आशियाई देशांची धूम्रपानासंदर्भात एक बैठक होणार आहे.
काय आहे ई-सिगारेट...सर्वसाधारण सिगारेटप्रमाणेच दिसणाऱ्या ई-सिगारेटमध्ये तीन भाग असतात. एक भाग असतो बॅटरी, जी चार्ज होऊ शकते.दुसऱ्या भाग हा अॅटोमायझर असतो .तर तिसरा भाग हा कार्ट्रिजचा .या कार्ट्रिजमध्ये प्रोपिलीन ग्लायकॉल, ग्लिसरीन आणि स्वाद निर्माण करणारे पदार्थ असतात .त्यात निकोटिनयुक्त किंवा निकोटिनमुक्त द्रवपदार्थ भरलेला असतो .बॅटरीचे बटन दाबताच हा द्रवपदार्थ अॅटोमायझरमध्ये गरम होऊन त्याची वाफ तयार होते.ही वाफ ओढली जाते. फुफ्फुसांमध्ये शिरते
सर्व प्रकारच्या ई-सिगारेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रोपिलीन ग्लायकॉलमुळे फुफ्फुसांना मोठे नुकसान होते.निकोटिन असलेले द्रव वापरले असेल तर आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो .एका अभ्यासातून ही सिगारेट उत्सर्जनमुक्त नसल्याचे आढळले आहे >> त्यामुळे ई-सिगारेट ही स्पेर स्मोकर्स अर्थात धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या जवळपास उभ्या असलेल्या व्यक्तीच्या आरोग्यासाठीही तेवढीच घातक आहे. .........
ई-सिगारेटच्या माध्यमातून संपूर्ण जगात धूम्रपानाला पुन्हा सामान्य सवय बनविण्याचा प्रयत्न होत आहे. ई-सिगारेटचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्याच ही सिगारेट आरोग्यास घातक नसल्याचा प्रचार करीत असल्याने खरी चिंता वाढली आहे.

No comments:

Post a Comment

Mobile apps games full versions,Download top apk games, computer hacking tools software,Become an Ethical Hacker

Thanks for Comments

We are not Providing any Download Links !