Mobile apps games full versions,Download top apk games, computer hacking tools software,Become an Ethical Hacker
गल्लोगल्ली नटसम्राट!!! -Assal Marathi sms Comedy
नटसम्राट म्हणजे कुसुमाग्रज यांची अजरामर कलाकृती. त्याच्यात प्रसिद्ध नट
असलेल्या गणपत बेलवलकर यांची निवृत्तीनंतर त्यांच्या पोरांमुळे म्हातारपणात
दुर्दशा होते. ह्या मूळ कथेला लेखनी अन अभिनयाच्या सहाय्याने कलाजगतात एक
रत्नमुकुट चढवला गेला. ह्या कथेतील मुख्य पात्राला ‘नट’ ह्याच्यातून बाहेर
काढलं तर एका म्हातार्या जोडप्याची त्यांच्या मुलाकडून झालेली अवहेलना
ह्या मर्यादित चौकटीत कथा अडकते. अशा कथेवर आधारित आजवर अनेक चित्रपट,
नाटक, कादंबर्या, लघु-चित्रपट वगैरे येथून गेले आहेत आणि अजूनही येत आहेत.
यात मूळ विषय आहे म्हातारपणात किंवा उतारवयात माणूस म्हणून जगणं अवघड
होणे.
अलीकडेच कामानिमित्त महाराष्ट्रातीलच एका बड्या शहरात महिनाभर राहायची संधी किंवा वेळ आली होती. शहर तसं बरच मोठं होतं. शहरातील एका टोकाच्या भागात राहत होतो. तेथे टीव्ही नव्हता. पेपर वाचायची सवय होतीच. त्यामुळे न चुकता रोज सकाळी उठून नाक्यावर जाऊन एक-दोन पेपर घेऊन येत असे. तो पेपर घेऊन जवळच असलेल्या एका टपरीवजा कॅंटीन वर जाऊन बसायचो. आठ-दहा दिवस झाले. एका दिवशी सकाळी लवकर जाग आलीच नाही. बराच उशीर झाला होता त्यामुळे पेपर मिळाला नाही. नेमकं त्याच रात्री समजलं की त्याच दिवशी पेपरमध्ये लोकल पुरवणीमध्ये कामाची बातमी आली आहे. मी इंटरनेट वर पेपर बघितला पण स्थानिक पुरवणी काही सापडली नाही. तिथे आजूबाजूला कोण ओळखीचं नव्हतं. शेवटी दुसर्या दिवशी पेपर घेतला आणि त्या पेपरवाल्याला कालचा पेपर मिळेल का म्हणून विचारलं. पेपर मिळाला. पण त्यानिमित्ताने त्यांच्याशी ओळख झाली. तसं बघायला गेलं तर तो माणूस बराच वृद्ध होता. त्यांचं वय होतं ७० वर्षे! साधारण ऊंची, सडपातळ देह, उभट चेहरा आणि दात बाहेर आलेले. दातांच्या तशा रचनेमुळे त्यांच्या चेहर्यावर नेहमी हास्य असल्यासारखं वाटायचं. मग सहज गप्पा होऊ लागल्या. एका दिवशी संध्याकाळी मी सहज फिरायला निघालो होतो. त्याच वेळीस ते गृहस्थ दिसले. काय चाललं काय नाही वगैरे विचारपूस झाली. माझाही चहाचा मूड होता, वेळ अन वातावरणही तसच होतं. मी त्यांना बसूयात म्हंटलं. आम्ही त्या चहाच्या टपरीकडे कूच केली. दोन स्पेशल मागवले. मग चर्चा सुरू झाल्या. मी कुठला, ते कुठले, मी काय करतो, ते काय करतात वगैरे प्रश्नोत्तरे झाली. एक एक उत्तरासोबत त्यांची करून कहाणी समजत होती. माझ्या दाढी वाढलेल्या चेहर्यात नेमकं काय आहे कोणास ठाऊक. मला करून कहाण्या सांगणारे भरपूर भेटतात… साला एकही प्रेमकहाणी सांगणारा भेटत नाही. असो. पण चेहर्यावर काहीच नसतं. खरा माणूस चेहर्याच्या आड, मनात असतो. समोरून कसाही दिसत असला तरी माणूस मूलतः ‘माणूस’ म्हणून कुठेतरी अस्तित्वात असतोच. बर्याचदा दारू किंवा नशा चढल्यावर अशा गोष्टी बाहेर पडतात. पण तेंव्हा चहा, वातावरण अन संगत यांची नशा चढत होती आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता.
ते गृहस्थ बोलत होते अन मी फक्त ऐकत होतो. ते गृहस्थ एका चांगल्या कंपनीत काम करणारे होते. त्यांचं वय होतं ७० वर्षे! अर्थात, त्यांचं शरीर अजून काटक अन मजबूत होतं. शरीराचे बुरजं कितीही भक्कम असले तरी मनाचे बुरुजाना भेगा पडून अजस्र किल्ला खिळखिळा झाला होता. त्यांचं शिक्षण होतं मॅट्रिक. ते गृहस्थ बोलू लागले.
“त्या काळचं मॅट्रिक म्हणजे अकरावीला असायचं. तेंव्हा ते पास होणं हेही कौतुकास्पद होतं. आतासारखं नाही, १००% मिळवणारे १०० विद्यार्थी. शिक्षणात काही अर्थ राहिला नाही आता. आयुष्यात दोन-तीन नोकर्या बदलल्या. सगळीकडे इमाने काम केलं. अखेर सगळ्यांप्रमाणे मानाने निवृत्त झालो. काही दिवस मन खिन्न होतं पण नंतर सवय लागली. पूर्वी गावाच्या मध्यात आमची एक जागा होती. गावाच्या अगदी मध्यात बरं. पण पोराच्या हट्टापाई ती विकली. अशी जागा मागूनही मिळाली नसती. आम्ही आधी तिथेच राहायचो. जुनाट जागा होती, अडचणीची होती, सोय नव्हती पण मध्यावर होती. पोराला गैरसोईत राहावं वाटेना. पोरगा हट्टाला पेटला. माझं ऐकलं नाही. त्याचं लग्न व्हायचं होतं ना. बायकोला अशा जागेत आणायची लाज वाटत होती त्याला. नवीन अन चकाचक जागेचा मोह बसला त्याला. मीही त्यावेळेस फार विचार केला नाही, कच खाल्ली. ऐकलं त्याचं आणि बसलो ती जागा विकून. अगदी किरकोळ किमतीत! आकडा सांगितला तर तुम्हाला आधी हसू आणि नंतर कीव येईल.”
गृहस्थ न थांबता बोलत होते. दरम्यान दूसरा चहा मागवला.
गृहस्थ बोलत होते, “किरकोळ किमतीला ती जागा शेजारीच राहणार्या आमच्याच चुलत्याला विकली. चुलता खुश झाला. शहारच्या मध्यवर्ती भागात लागून मोठी जागा मिळाली होती त्याला. त्या किरकोळ पैशातून शहराच्या एवढ्या बाहेर येऊन लहानशी जागा घेतली मुलासाठी. बरं चाललं होतं सगळं पण कोणालातरी बघावलं नाही. मुलाचं लग लाऊन दिलं. मुलगा चांगल्या कंपनीत नौकरी करतो, सूनही नौकरी करणारीच. दोघे मिळून चांगलं कमावत होते. पण सुनेशी आमचं पटेना. चूक-बरोबर कोणास ठाऊक पण घडलं मात्र चुकच! पोराने सांगितलं आम्हाला की तुमचं तुम्ही बघा!!! हे तर खूप क्लेशदायक होतं. ज्याच्यासाठी वाडवडिलांची आशीर्वाद असलेली जागा विकली, त्याच पैशातून याच्या नावावर नवा फ्लॅट घेतला अन त्याच घरात आम्ही उपरे झालो. घरात कोपर्यात पडून असतो पण स्वाभिमान दुखावला की जगणं अवघड होतं. पेंशन तुटपुंजी होती अन आम्हा दोघांचे, माझे अन मंडळींचे औषध-पाण्याचेही खर्च कसेबसे भागायचे. पोरगा-सून लाखाच्या नोकर्या करतात पण आई-बापासाठी पैसा नाही त्यांच्याकडे. त्यांच्या मुलासाठी जमवत आहेत ते… बरोबर आहे; ते नव्या पिढीचे, भविष्य. अन आम्ही निकामी, दिवस भरलेले आमच्यात पैसा गुंतवून वाया जाईल न… असं म्हणत असताना त्यांच्या डोळ्याच्या कडा जराशा ओल्या झालेल्या जाणवल्या पण चहाचा घोट घेताना त्याही गरफ वाफेसोबत नाहीशा झाल्या. त्यांना राहून-राहून एकाच गोष्टीचा पश्चाताप होत होता की, आपण आपलं जुनं हक्काचं घर विकून इकडे उगाचच आलो. येथे पायर्या चढताना गुडघे दुखतात अन त्रास होतो अशीही त्यांची तक्रार. हे मानसिक पातळीवरही लागू होतं. घराकडे जाताना जेंव्हा पावले जड होऊ लागतात तेंव्हा घर हे घर नसून आसरा झालेला असतो. मग ते गृहस्थ उदरनिर्वाह अन मन गुंतवण्यासाठी पेपरचा कट्टा टाकून बसतात. इतर असेच काम करतात. घराकडे जायची वेळ लवकर येऊ नये इतकाच प्रयत्न असतो. मग येणार्या-जाणार्याने आपल्याशी बोलावं हा प्रयत्नही असतो.
जग कुठे चाललं आहे असं म्हणणं थोडसं जोखमीचं ठरेल. कारण नटसम्राट ही चार दशक जुनी कलाकृती घडली तेंव्हाही तशीच परिस्थिती होती असं लेखकाच्या निदर्शनास आलं असेल. आज तरी वेगळं काय आहे. फक्त त्याची frequency अन style बदलली असेल. अर्थात सगळीकडे असच आहे असं म्हणता नाही येणार. पण म्हातार्या माणसांचे ‘हाल’ अन भावना समजण्याच्या पलीकडे असतात. हातात मोबाइल घेऊन बसलेली नातवंड अन मुलं पाहून जो मुकेपणा येतो ती पीडा समजून घेणं अशक्य आहे. बोलणारं कोणी नाही? समजून घेणारं कोणीही नाही असा हा टप्पा… गती अन मती याचा ताळेबंद मांडताना गतीचं आकर्षण ठरलेल्या ह्या जगात शांतपणे लुकलुकणारे दिवे मागे निघून जातात, दुर्लक्ष होतं तेंव्हा कुठेतरी चुकत असतं. मग गल्लोगल्ली असे नटसम्राट दिसू लागतात. येथे चूक-बरोबर कोण हे कोणीही सांगू शकत नाही. त्या गृहस्थांची सगळी माहिती खरी आहे असं मानलं तरी ती केवळ एकच बाजू असते. दुसरीही बाजू असतेच की? ह्या परिस्थितीला एक गोंडस नाव देण्यात आलं आहे. ते म्हणजे ‘Generation Gap.’ पण आई-वडील आणि मुलं असं हे नातं नंतर मुलं आणि आई-वडील ह्या टप्प्यावर येतं तेंव्हा काहीतरी गफलत होते. ही निसर्गाची शिडी प्रत्येकाला चढावीच लागते. प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी सर्वस्व अर्पण करतात, अगदी जन्मदात्या आई-बापाला दुर्लक्षित करून आणि दुखावून… पण तीच मुलं आपल्या आई-बापाशी नंतर तशीच वागतात… ही साखळी चुकत नाही आणि हे गणित काही सुटत नाही. दुनिया गोल है, सब झोल है!!!
दरम्यान त्या गृहस्थांनी चहा वगैरे संपवून झाला. बराच उशीर झाला होता. मला रूमवर परतायचं होतं. पण त्या गृहस्थांना तशी गडबड नव्हती. मी निघालो होतो. ते तेथेच बसले होते. मनात पुन्हा उजळणी करत!!! गणित सोडवण्यात कुठेतरी एखाद हातचा धरायचा विसरला नाही न?

No comments:
Post a Comment
Mobile apps games full versions,Download top apk games, computer hacking tools software,Become an Ethical Hacker
Thanks for Comments